मावळ: मावळ मधील देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत एकाच कुटुंबातील दोन मुलींना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे बुधवारी (ता. 29) स्पष्ट झाले. बोर्ड प्रशासनाने गुरुवारपासून (ता. 30) तीन मेपर्यंत लॉकडाउन अधिक कडक करण्याचे आदेश दिले असून, रुग्ण आढळलेला भाग 'सील' करण्यात आला आहे. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग आता मावळ तालुक्याच्या वेशीवर येऊन ठेपला आहे.नागरीकांनी आता अधिक दक्षता घेणे जरुरी चे आहे.
नागरीकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.अती अवश्यक काम असेल तरच घरा बाहेर पडावे.असे अवाहन भाजपा तालुका अध्यक्ष रविंद्रआप्पा भेगडे यांनी केले .
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने पुढील काही दिवस अत्यंत महत्वाचे आहेत. कृपया शासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना पाळा.सार्वजनिक कार्यक्रम, गर्दीची ठिकाणे टाळा, स्वच्छता राखा, आपले हात सतत स्वच्छ ठेवा, शिंकताना किंवा खोकताना नाक आणि तोंड, रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका. ताप असेल, श्वास घ्यायला त्रास होत असेल आणि खोकला असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
0 टिप्पण्या