Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय जनता पार्टी तालुका नुतन कार्यकारणी जाहीर..

मावळ - 
           भारतीय जनता पार्टी मावळ तालुका यांची नुतन कार्यकारणी बैठक तळेगाव दाभाडे येथील इशा हाँल येथे  तालुका अध्यक्ष रविंद्रआप्पा भेगडे यांच्या अध्यक्षखाली पार पडली. तालुक्यातील चक्रीय पद्धतीने प्रत्येक तीन गावामागे एक तालुका पदाधिकारी अशी रचना केली.
           कार्यक्रमात  मा.राज्यमंत्री बाळा भेगडे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी नविन नियुक्त पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले. संघटण मंत्री किरण राक्षे यांनी आगामी संघटनकार्या बद्दल माहिती दिली.नियुक्तीत पदाधिकार्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.वेहरगाव मधील नुकतीच सरपंच निवड झाली सौ.कल्पना माने यांचा सत्कार करण्यात आला .
          या प्रसंगी पु.जि.बँक संचालक बाळासाहेब नेवाळे,युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे.प्रशांत ढोरे मा.सभापती राजाराम शिंदे,ज्ञानेश्वर दळवी,एकनाथ टिळे,शिवाजी टाकवे, गुलाबकाका म्हाळस्कर शांताराम कदम,गणेश गायकवाड ,बाळासाहेब जाधव ,सुनिल चव्हाण आदि मान्यावर उपस्थित होते.
         कार्यक्रमाचे आभार विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यु शिंदे यांनी केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या