Ticker

6/recent/ticker-posts

वडगांव नगरपंचायत च्या नवीन झालेल्या प्रशासकीय इमारतीस श्रीमंत सरदार महादजी शिंदे यांचे नाव द्यावे विरोधीपाक्षनेत्या अर्चना म्हाळसकर यांची मागणी....

 वडगाव मावळ :- वडगाव नगरपंचायतीची स्थापना होऊन पाच वर्ष कालावधी पूर्ण होत असताना, ज्यावेळी वडगाव ग्रामपंचायत चे रूपांतर नगरपंचायत मध्ये झाले .
 त्यावेळचे सरपंच नितिन कुडे ,उपसरपंच  संभाजी म्हाळसकर यांचे शुभहस्ते , नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन करून कामाला सुरवात देखील झाली होती, तदनंतर च्या कालावधी मध्ये नगराध्यक्ष मयूर ढोरे, हे नगराध्यक्ष झालेवर, माघील पाच वर्षात इमारत पूर्णतःवास येत असताना विरोधी पक्षनेत्या अर्चना म्हाळसकर यांनी मुख्यधिकारी प्रविण निकम यांना दिलेल्या निवेदनातून असे म्हणले आहे कि, वडगाव शहराला स्वतंत्र असा इतिहास आहे, तो म्हणजे दी ग्रेट मराठा महादजी शिंदे यांचा, त्यांनी 14 जानेवारी 1779 रोजी, वडगाव मावळ मधील इंग्रजाविरुद्धची ऐतिहासिक लढाई जिंकून वडगाव मावळ साठी अजरामर असा इतिहास त्यांच्या नेतृत्वाखाली घडविण्यात आला, अशा श्रीमंत सरदार महादजी शिंदे यांचे नाव नव्याने स्थापन व बांधण्यात आलेल्या नगरपंचायतीच्या नवीन इमारतीस  देण्यात यावे असे निवेदन भाजपच्या सर्व नगरसेवकांच्या वतीने विरोधी पक्ष नेत्या अर्चना म्हाळसकर यांनी  मुख्याधिकारी यांना दिले आहे.
श्रीमंत सरदार महादजी शिंदे यांची गौरवगाथा असलेला माहिती आलेखाचा एक स्वतंत्र्य दिपस्तंभ नव्याने करावा अशी मागणीसुद्धा करण्यात आली आहे.
यावेळी भाजपा चे नगरसेवक, गटनेते दिनेश ढोरे,नगरसेवक किरण म्हाळसकर,दिलीप म्हाळसकर, दीपाली मोरे,रविंद्र म्हाळसकर आदि जणांनी सही करून निवेदन दिले 
 श्रीमंत सरदार महादजी शिंदे यांचे नाव  नगरपंचायत इमारतीस दिल्याने, त्यांच्या पराक्रमाची शौर्यगाथा पिढ्यानंपिढे पुढे चालू राहील, हिच यामाघील मुख्य धारणा आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या