वडगाव दि.२० - वडगाव येथे आठ दिवसांपूर्वी काही महिला भगिनींनी भेट घेऊन रेशन कार्ड काढण्यासाठी अडचणी येत असल्याचे सांगून रेशनकार्ड काढून देण्यासाठी मदत करावी अशी विनंती तालुकाध्यक्ष रविंद्रआप्पा भेगडे यांच्या कडे केली होती. यासंदर्भात पुरवठा निरीक्षक साहेबांना योग्य त्या सूचना देऊन या महिला भगिनींनी रेशनकार्ड काढण्यास काहीही अडचण येता कामा नये सुचना देऊन सदर भगीनींचे अर्ज तहसीलदार कार्यालय येथे अर्ज दाखल केले.
भारतीय जनता पार्टी वडगाव शहर व इतर सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी यासंदर्भात पाठपुरावा करून आज या महिला भगिनींनी रेशनकार्ड वाटप केले.आठ दिवसात रेशनकार्ड मिळाल्याने महिला भगिनींनी आभार मानले..!
याप्रसंगी कोषाध्यक्ष श्री.सुधाकर भाऊ ढोरे, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू भाऊ शिंदे,वडगाव नगरपंचायत चे नगरसेवक श्री.दिलीप भाऊ म्हाळसकर, मा.सरपंच नितीन भाऊ कुडे,युवा नेते महेंद्र भाऊ म्हाळसकर,वडगाव शहर युवा मोर्चा अध्यक्ष विनायक भाऊ भेगडे,अंदर मावळ विद्यार्थी आघाडी अध्यक्ष विठ्ठल भाऊ तूर्डे आदी उपस्थित होते.
आप्पा मुळ राशनकार्ड मिळ्ल - भगीनींनी रेशन कार्ड मिळाल्यावर भावना व्यक्त केल्या.
0 टिप्पण्या