Ticker

6/recent/ticker-posts

तहसील कार्यालय वतीने राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरावडा अंतर्गत "कामशेत"येथे महासेवा मेळावाचे आयोजन......

कामशेत - शासन निर्देशानुसार १७ सप्टेंबर २०२२ राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस  ते २ ऑक्टोबर २०२२ राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती पर्यंत  राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरावडा हा कार्यक्रम राबविण्यात येत असुन शुक्रवार दिनांक २३ सप्टेंबर २०२२ रोजी कामशेत येथे श्री गणेश मंगल कार्यालय या ठिकाणी सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत महासेवा मेळाव्याचे आयोजन केले आहे.
यात नवीन रेशन कार्ड काढणे, रेशन कार्ड विभक्त करणे ,आधार कार्ड नोंदणी करणे, मददार यादी मध्ये नाव नोंदणी करणे ,उत्पन्न दाखला जातीचे दाखले,  संजय निराधार योजना, श्रावण बाळ योजना अर्ज भरून देणे, कृषी विभागाकडील विविध योजनांची माहिती देणे, पंचायत समितीकडील विविध योजनांची माहिती,  आरोग्य विभागाकडील  योजनांची माहिती देणे ,कोविड १९ लसीकरण करणे, ज्येष्ठ नागरिक पास काढणे ,नगरपालिकेकडून विविध योजनेची माहिती देणे, महिला बालकल्याण विभागाकडील विविध योजनांची माहिती देणे, पशुवैद्यकीय विभागाकडील विविध योजनांची माहिती देणे इ. कार्यक्रम या सेवा पंधरवडा अंतर्गत महामेळाव्यामध्ये होणार आहे अशी माहिती मावळ तहसीलदार मधुसूदन बर्गे  यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या