पारिठेवाडी : ग्रुप ग्रामपंचायत इंगळूण अंतर्गत येणाऱ्या पारिठेवाडी येथील नागरिकांना 5 ते 6 दिवसांनी पाणीपुरवठा होतोय.गावाजवळच धरण तसेच प्रत्येक घरोघरी नळजोडणी असून देखील नागरिकांची "धरण आहे उशाला,पाणी नाही नळाला,कोरड आहे घशाला" अशी समस्या निर्माण झाली आहे.
पारिठेवाडीतील ग्रामस्थ सांगतात की ग्रामपंचायतची 1200 रुपये पाणी पट्टी भरून सुद्धा गावात पाणीपुरवठा 5-6 दिवसांनी होतो.कधी अर्ध्या गावात पाणी येते तर कधी अर्ध्या गावात पाणी उशीराने कमी दाबाने येते.कधी कधी पाणी आले तर लगेच पाणीपुरवठा बंद केला जातो.ह्याकडे ग्रामपंचायत प्रशासनाकडे विचारणा केली असता होईल,करतो अशी उत्तर मिळतात.प्रत्यक्षात मात्र काहीच उपाययोजना होताना दिसत नाही.त्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले असून प्रशासनाकडून लवकरात लवकर समस्या दूर करून पाणी पुरवठा प्रश्न मार्गी लागण्याची आशा व्यक्त करत आहे.
0 टिप्पण्या