सोमाटने:- सोमाटणे येथील (आय आर बी संचालित) टोल नाक्यावर स्थानिक नागरिकांकडून होत असलेल्या वाहन टोल वसुली विरोधात व कर्मचाऱ्यांच्या अरेरावी विरोधात सर्वपक्षीय निवेदन देण्यात आले.
यावेळी सभागृहनेते अमोल शेटे,जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे, तळेगाव दाभाडे नगरपरिषद आरोग्य सभापती किशोर भेगडे,गटनेत्या सुलोचनाताई आवारे, शिक्षण मंडळ सभापती अनिता पवार,बांधकाम समिती सभापती निखिल भगत व बऱ्याचं संख्येने स्थानिक नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते.
स्थानिक नागरिकांच्या वाहनांना लावण्यात आलेले फास्ट टॅग,तसेच टोल कर्मचारी वर्गाकडून होणारी सक्तीची टोल वसुली यामुळे नागरिकांना आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.स्थानिक प्रवासासाठी टोल भरावा लागतं असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
सदर निवेदनात सात ते आठ दिवसांच्या आत सकारात्मक प्रतिसाद आला नाही तर समस्त मावळवासीय नागरिक संपूर्ण परिवारासहित तीव्र आंदोलन करतील व यास सर्व टोल प्रशासन जबाबदार राहील असे म्हटले आहे.
0 टिप्पण्या