*कामशेत शहरातील कचऱ्याची वाढती समस्या लक्षात घेता, आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो. या भावनेने गावातील स्वच्छता राखण्यासाठी एक पाऊल पुढे येऊन कामशेत शहरातील श्री आनंदराम पन्नालाल भटेवरा जैन इंग्लिश स्कूल चे संस्थापक अध्यक्ष व संचालक मंडळ यांच्या वतिने सुनिलशेट भटेवरा यांच्या हस्ते गावातील स्वच्छतेच्या दृष्टीने कचरा वाहतूक करण्यासाठी एक ट्रेलर ग्रामपंचायतीस भेट देऊन शहराच्या स्वच्छतेत भर दिला आहे.*
*ग्रुप ग्रामपंचायत कामशेत चे वतीने*
*श्री आनंदराम पन्नालाल भटेवरा जैन इंग्लिश स्कूल च्या संस्थापक अध्यक्ष व संचालक मंडळ यांचे मनापासून अभिनंदन व मनापासून आभार मानले*या कार्यक्रमात संत तुकाराम साखर कारखाना संचालक बापुसाहेब भेगडे,जि.प.सभापती बाबुरावआप्पा वायकर,मा.उपसरपंच गणपत शिंदे,भाजपा विद्यार्थी अध्यक्ष अभिमन्यु शिंदे ,सरपंच रुपालीताई शिंनगारे,सारीकाताई शिंदे,सारिकाताई घोलप ,जनाबाई पवार,उपसरपंच संतोष कदम सर्व सदस्य उपस्थित होते.
0 टिप्पण्या