Ticker

6/recent/ticker-posts

प्रबोधन क्लासेस आणि यश कोचिंग क्लासेस मधील विद्यार्थ्यांनी परंपरे प्रमाणे याही वर्षी मिळवले उत्तुंग यश...कुमारी अक्षदा गुरव ९० टक्के गुण मिळवून प्रबोधन आणि यश कोचिंग क्लासेस मध्ये प्रथम...


कामशेत - तेहतीस वर्षाच्या उत्तुंग अनुभव असलेल्या प्रबोधन क्लासेस आणि यश कोचिंग क्लासेस मधील विद्यार्थ्यांनी परंपरे प्रमाणे याही वर्षी उत्तुंग यश संपादन केले आहे. कोरोना साथीची परिस्थिती असताना सुद्धा या दोन्ही क्लासेसचा दहावी मार्च २०२२ चा निकाल शंभर टक्के लागला आहे हे निश्चितच कौतुकास्पद आहे.

       कुमारी अक्षदा गुरव या विद्यार्थिनीने ९० टक्के गुण मिळवून प्रबोधन आणि यश कोचिंग क्लासेस मध्ये पहिला क्रमांक व पंडित नेहरू विद्यालय मध्ये देखील दृतिय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे .क्लास चे सर्व विद्यार्थी अतिशय उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत.

    बारावीच्या २०२२ झालेल्या निकालामध्ये अकाउंट मध्ये कुमारी साक्षी जैन ८८/१०० व कुमारी वैष्णवी कोंढरे ८२/१०० मार्क्स मिळवून उत्तीर्ण . प्रबोधन क्लासेसचे प्रा.धनंजय मिठारे सर व यश कोचिंग क्लासेसचे प्रा.धनेश एडके सर यांच्या दर्जेदार व अनुभवी मार्गदर्शनाने आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी यशाचे शिखर गाठले आहे. तसेच यावर्षी देखील अतिशय उत्कृष्ट निकाल लागलेला आहे. त्याबद्दल प्रबोधन क्लासेस व यश क्लासेस यांच्यावर कामशेत परिसरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहेत. क्लासेसच्या वतीने यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन तसेच सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या