Ticker

6/recent/ticker-posts

१४०० कोटी रुपयांचा हिशोब देणार, विद्यमान आमदार यांनी चर्चेसाठी समोरा-समोर यावे - मा.राज्यमंत्री संजय(बाळा) भेगडे


       शुक्रवार दि.३०/१०/२०२० रोजी दुपारी  १०.३० वाजता भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय, वडगाव मावळ या ठिकाणी मा.राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या माध्यमातून मावळ तालुक्यात झालेल्या १४०० कोटी रुपयांच्या पूर्ण झालेल्या तसेच मंजूर विकास कामांचा तपशील पत्रकार परिषद घेवून विद्यमान आमदार यांना देणार आहे. 

        सदर पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, सभापती निकीताताई घोट्कुले, उपसभापती दत्ता शेवाळे, जि.प.सदस्य नितीन मराठे, लोणावळा नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव, तळेगाव नगराध्यक्षा चित्राताई जगनाडे, देहूरोड बोर्ड उपाध्यक्ष रघुवीर शेलार, जि.प.सदस्य अलकाताई धानिवले, पंचायत समिती सदस्य गुलाबराव म्हाळसकर, शांताराम कदम, जिजाबाई पोटफोडे, सुवर्णा कुंभार,ज्योती शिंदे,महीला आघाडी अध्यक्ष सायलीताई बोत्रे, संघटणमंत्री किरण राक्षे,सरचिटणीस सुनिल चव्हाण,मच्छिद्र केदारी,  विद्यार्थी अध्यक्ष अभिमन्यु शिंदे ,सोशल मिडीया अध्यक्ष सागर शिंदे,क्रीडा आघाडी अध्यक्ष नामदेव वारींगे,दिव्यांग आघाडी अध्यक्ष विकास लिंभोरे या प्रमाणे सर्व मंडल अध्यक्ष, गट व गणाचे अध्यक्ष, गटनेते तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.  

                तरी सदर पत्रकार परिषदेसाठी सर्व पत्रकार बंधू-भगिनी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन मा.राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या